Site icon e लोकहित | Marathi News

Salaar Movie Collection । ‘सालार’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोडला ‘Animal’चा विक्रम, जमवला ‘इतका’ गल्ला

salaar-box-office-collection-day-1

Salaar Movie Collection । ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Neil) यांचा ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ (Salar Part 1: Ceasefire) हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) हा मुख्य भूमिकेत आहे. 22 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सालार’ने Animal, (Animal) जवान (Jawan) आणि पठाणचा (Pathan) विक्रम मोडला आहे. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येही ‘डंकी ‘ला (Dunki) मागे टाकले होते. (Latest Marathi News)

Maharashtra Politics । लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा खासदार भाजपच्या वाटेवर

अभिनेता प्रभासने या चित्रपटाच्या (Prabhas New Movie) माध्यमातून जोरदार कमबॅक केलं आहे. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. कमाईचा (Salaar Box Office Collection) विचार केला तर या चित्रपटाने ओपनिंग डेला 95 कोटींची कमाई केली आहे.

Maratha Reservation । धक्कादायक! मराठा सभेपूर्वीच बीडमध्ये ५० वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या, चिठ्ठीद्वारे केली मोठी मागणी

चित्रपटाला सेन्सॉरने ए सर्टिफिकेट दिलं असून तो हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट पॅन इंडिया चित्रपट असून प्रभाससह या चित्रपटात श्रुती हासन (Shruti Haasan), पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू रेड्डीसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. उत्तम कथानक, दिग्दर्शन असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत आहे.

Shiv Sena Clash । ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा सामनेसामने, ‘त्या’ वक्तव्याने तापलं वातावरण

Spread the love
Exit mobile version