Salman Khan । बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे सतत चर्चेचा विषय बनत असतो. सलमान खानशी निगडित कोणतीही बातमी असो, ती चाहत्यांना उत्तेजित करते. नुकताच अभिनेत्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Salman Khan Video) होत आहे, यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
नुकतीच चित्रपट निर्माते आनंद पंडित (Anand Pandit) यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सलमान खान देखील पार्टीत होते. सध्या या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सलमान खान हा अमिताभ बच्चन यांचा हात मिळवून त्याची भेट घेताना दिसत आहे. पुढे तो बाजूला उभ्या असणाऱ्या अभिषेक बच्चनला मिठी मारली. (Salman Khan and Abhishek Bachchan Video)
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चांगल्याच कमेंट केल्या आहेत. “ऐश्वर्या आला असती तर छान वाटलं असतं,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “आता तर सगळं ठीकच होणार…ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होत आहे,” दरम्यान, सलमान खान आणि ऐश्वर्या काही काळ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.
Manglashtaka in Marriage । हिंदू विवाहात किती मंगलाष्टक असाव्यात? तुम्हाला माहिती आहे का?