Salman Khan । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने आत्महत्या केली आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानासमोर झालेल्या गोळीबारातील आरोपी अनुज थापन याने बुधवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
कोठडीतील मृत्यूची चौकशी राज्य सीआयडी करणार आहे. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी 23 वर्षीय अनुज थापनने लॉक-अप टॉयलेटमध्ये चादरीने फास लावून आत्महत्या केली आहे.
Crime News । ‘दाढीवाले काका आणि…’, ८ वर्षीय मुलीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं भयानक; घटना वाचून बसले धक्का
थापनला शासकीय जीटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की थापन हा मूळचा पंजाबचा असून त्याला सोनू कुमार बिश्नोईसह सागर पाल आणि विकी गुप्ता या नेमबाजांना शस्त्रे पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार चिडले; पाहा Video