Salman Khan Birthday । सलमान खान (Salman Khan ) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा चर्चेत असतो. बॉलीवूड मधील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सलमानचा देखील समावेश होतो. सलमानचा जगभर मोठा चाहता वर्ग आहे. बॉलीवूडवर वर्चस्व गाजवणारा सलमान हा उद्या बुधवारी 58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमान खान बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता असला तरी खऱ्या आयुष्यात त्याला साधे राहणे आवडते. म्हणूनच तो मोठ्या बंगल्यात नाही तर गॅलेक्सी अपार्टमेंटमधील एका छोट्या फ्लॅटमध्ये खूप आनंदाने राहतो. (Salman Khan House)
सलमानच्या या फ्लॅटमध्ये राहण्यामागचे कारण कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचल्यानंतर अभिनेत्यानेच उघड केले. सलमान खान म्हणाला होता की, मला नेहमी माझ्या कुटुंबासोबत घालवायचे आहे आणि त्या घरात राहून मी कुटुंबासोबत आहे. म्हणूनच मला मोठ्या घरासाठी खर्च करायला आवडणार नाही. सलमान खानचे कुटुंब त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहते. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान एका चित्रपटासाठी १०० कोटींपेक्षा जास्त पैसे घेतो.
Girish Mahajan । मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांनी केले सर्वात मोठे व्यक्तव्य!
सलमान खानचा मित्र आणि प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी सलमानसोबत जवळपास 15 वर्षांपासून काम करत आहे आणि इतक्या वर्षांमध्ये मी त्याला कधीही लक्झरी वस्तू पसंत करताना पाहिले नाही. सलमान नेहमीच साधेपणाने वागला आहे. याशिवाय इतरांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असतो. असं ते म्हणाले आहेत.