
Salman Khan । रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार करून पळ काढला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. घटनेच्या वेळी सलमान खान घरीच होता. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Supriya Sule । सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारावर सुप्रिया सुळेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील घराबाहेर दुचाकीवरून आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर चोरटे पळून गेले. हल्लेखोरांनी सलग चार राऊंड गोळीबार केला. सध्या गोळीबाराच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये गोळीबारानंतर आरोपी पळताना दिसत आहेत.
Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य
- व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. आरोपी दुचाकीवरून आले एकूण सहा गोळ्या झाडण्यात आला. त्यातील एक गोळी ही सलमान खानच्या गॅलरीमध्ये देखील झाडण्यात आली. आणि नंतर आरोपी पळून गेले. ही सर्व घटना तेथील कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. न्यूज १८ मराठीने हा व्हडिओ एक्सवर शेअर केला आहे.
धक्कादायक घटना समोर आली आहे, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घरासमोर गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. pic.twitter.com/fQC0uVNvaP
— News18Lokmat (@News18lokmat) April 14, 2024