मनोरंजन क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींभोवती धमक्यांचे सावट सतत घोंघावत असते. प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमधील प्रमुख आरोपी लॉरेन्स बिश्नोई ( Lorence Bishnoi) याने मध्यंतरी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे मनोरंजन क्षेत्रात गोंधळ उडाला होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीमागचे कारण स्पष्ट केले आहे.
मोठी बातमी! कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी केली अटक
यामध्ये त्याने केलेल्या खुलाश्याने हत्याकांड आणि बॉलिवूड कनेक्शन याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याच झालं असं होतं की, बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानकडून मोठी चूक झाली होती. यामुळे सलमानकडून ( Salman Khan) बिश्नोई समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर समाजातील लोकांची अपेक्षा होती की, सलमान खानने किमान एकदा तरी त्यांची माफी मागावी.
भारतातील सर्वात लहान कार लवकरच लाँच होणार! जाणून घ्या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये
मात्र सलमान खानने माफी मागितली नाही. यामुळे बिश्नोई समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान लॉरेन्स म्हणाला की, “सलमान खानने आमच्या समाजाची माफी मागावी, मात्र त्याने माफी मागितली नाही, तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल. सलमानने आम्हाला अपमानित केले आहे. त्यामुळे त्याने माफी मागीतलीच पाहिजे. ही धमकी नसून आमची विनंती आहे”
“…तर शिंदे सरकार कोसळणार”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच मोठ वक्तव्य