गेल्या 100 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक असे कलाकार आहेत. जे देशातील लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. बॉलीवूडचे दिग्गज तारे अनेक दिवसांपासून मुंबईत लाखो रुपयांच्या मालमत्तांची गुंतवणूक आणि खरेदी करत आहेत. त्यापैकी एक बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान. सलमान खानबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
काहीतरी शिजतंय? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन नाना पाटेकर यांनी केली ‘या’ विषयावर चर्चा
सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चित असतो. कधी त्याचे व्यावसायिक जीवन प्रसिद्धीच्या झोतात राहते. तर कधी त्याचे वैयक्तिक आयुष्य चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. दरम्यान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला असून या चर्चेचा कारण वेगळच आहे. सलमान खान मुंबई स्वतःचे हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे.
मुंबईतील वांद्रे भागातील कार्टर रोडवर एक अपूर्ण इमारत पाडून हे हॉटेल बांधले जाणार आहे. ही मालमत्ता सलमान खानची आई सलमा खान यांच्या नावावर आहे. या इमारतीत खान कुटुंबीयांचे अपार्टमेंट असून, ते गेल्या 15 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. आता ही अपूर्ण इमारत पाडून 19 मजली हॉटेल बांधण्याची योजना खान कुटुंबीयांनी आखली आहे.
दिल्लीच्या पीचवर चेन्नईचा धमाका! ऋतुराजच्या कॅचमुळं वॉर्नरचं शतक हुकलं, पाहा ‘त्या’ कॅचचा Video
हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट बांधण्यात येणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर म्हणून वापरला जाईल. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर असतील, तर सातव्या मजल्यापासून १९व्या मजल्यावर हॉटेलच्या सर्व खोल्या असतील.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मल्चिंग पेपरसाठी मिळणार 50 टक्के अनुदान; असा करा अर्ज