बाॅलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखल जाणार अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan) होय. सलमानने आपल्या दमदार अभिनयाने प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. पण अभिनेता सलमान खान काही लग्न (marriage) करेना आणि लग्नाच्या चर्चा काही थांबेना. आता पुन्हा एकदा भाईजानच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर (Social Media) रंगली आहे.
‘दादा मला माफ करा…’; गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी
सलमान खान 57 वर्षांचा झाला आहे. पण आजही तो अविवाहित आहेत. आतापर्यंत सलमान खानचे नाव अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. यादरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस 16’च्या अंतिम फेरीत लग्नाविषयी सलमान खानने मोठं वक्तव्य केल आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात आनखी चर्चा सुरू झाली आहे.
अंतिम फेरीदरम्यान शालीन भनोटला (Shalin Bhanot) म्हणाली की, मला ‘बिग बॉस’च्या माध्यमातून सलमान खानकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच, मीदेखील आता सलमानसारखं एकटं राहण्याचा विचार करत आहे, असेही ती म्हणाली. त्यानंतर सलमान खान म्हणाला की, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने अविवाहित राहीलेलो नाही.
“संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे”, भाजपच्या नेत्याने राऊतांवर केली जहरी टीका
सलमानच्या या वक्तव्यानंतर सलमान खानला लग्न करायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यादरम्यान, सलमान खानचा ‘गदर २’ या सिनेमाच प्रमोशन करण्यात आले. तसेच सलमानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चे पहिले गाणं रिलीज झाला आहे.
अजित पवार यांनी राहुल कलाटेंना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “माझी विनंती आहे की…”