Site icon e लोकहित | Marathi News

सलमान-शाहरुख ‘या’ कारणाने येणार आमने सामने

Salman-Shah Rukh will face each other for this reason

नवी दिल्ली | स्पाय युनिव्हर्सचा (Spy Universe) प्रयोग करत 4 वर्षानं अभिनेता शाहरुख खानने पठाण चित्रपटातून कमबॅक केलं. पठाण चित्रपटानं अगदी मोठ्या मोठ्या चित्रपटांना मागं टाकलं आहे. सुप्रिसिद्ध ठरलेल्या बाहुबलीचित्रपटाला देखील पठाणनं मागं टाकलं आहे. या चित्रपटाने तब्बल 900 कोटींची कमाई केली आहे.

जय श्रीरामचा गजर, बुलेट स्वारी अन् नवनीत राणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘पठाण’ चित्रपट हिट होण्याची अनेक कारणं आहेत. यातीलच एक महत्तावाचं कारण म्हणजे चित्रपटात भाईची अर्थात सलमान खानची एन्ट्री होय. सलमानच्या चाहत्यांनी देखील या कारणामुळं पठाण चित्रपटाला पसंती दर्शवली. अगदी पाच मिनिटांसाठी असलेल्या सलमान भाई आणि शाहरुखचा सिन संपूर्ण चित्रपटात महत्त्वाचा ठरला.

आज रामनवमीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार!

अशातच  शाहरुख आणि सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. सलमानच्या टायगर चित्रपटांनीदेखील चांगलाच डोक्यावर घेतला होता. या दोन्ही चित्रपटातून आता पुन्हा ही जोडी दिसणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सिनेमासृष्टीत नवीन प्रयोग सुरु आहेत.

सलमान-शाहरुख ‘या’ कारणाने येणार आमने सामने

लवकरच सलमान आणि शाहरुख ‘टायगर वर्सेज पठाण’ या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून यासाठी जबरदस्त पैसा खर्च केला जाणार आहे. हे फ्युजन पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

कोरोनाचा कहर! भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ

Spread the love
Exit mobile version