
आजकाल प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय (Aditya Roy)त्याच्या ‘द नाईट मॅनेजर ’या (The Night Manager) वेब सीरिजच्या (Web Series) प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. या सीरिजमध्ये आदित्य रॉयने शान सेनगुप्ताची भूमिका साकारली आहे. जो माजी नौदलाचा अधिकारी आहे. त्याच वेळी, या आगामी शोच्या स्क्रीनिंग दरम्यान आदित्य रॉय सोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ मार्गावर मिळणार
यावेळी, आदित्य रॉयच्या एका महिला चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याचा बहाना करत जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. अनेक नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.
ब्रेकिंग! ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी; प्रकरण ७ सदस्यीय
आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे. आदित्य राॅयचे करोडे चाहते आहेत. आदित्य नेहमीच आपल्या अभिनयातून वेगवेगळे कौशल्य दाखवत असतो. पण आदित्यला कधी कधी त्याच्या साधेपणाचे काही नकारात्मक परिणाम भोगावे लागतात.
मोठी बातमी! बागेश्वर बाबाच्या दरबारात महिलेचा मृत्यू
दरम्यान, आदित्य त्याच्या आगामी ‘द नाईट मॅनेजर’ या मालिकेच्या स्पेशल स्क्रिनिंगमधून परतत असल्याचे दिसते. ही मालिका ब्रिटिश वेब शोचे हिंदी रूपांतर आहे. ‘द नाईट मॅनेजर’मध्ये अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.