
Sambhaji Bhide । शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेचा विषय बनत असतात. अनेकदा ते अडचणीत देखील येतात. त्यांना वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. अशातच आता संभाजी भिडेंची कार अडवून प्रचंड घोषणाबाजी देत दाखवले काळे झेंडे (Attack on Sambhaji Bhide Car) दाखवल्याची घटना घडली आहे. (Latest marathi news)
भिडे यांना मनमाडमध्ये काल रात्री भीमसैनिकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. (Attack on Sambhaji Bhide) या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही जणांनी संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Car Accident । मोठी दुर्घटना! केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे गुरुवारी नाशिकच्या येवला येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले होते तेव्हा मालेगाव चौफुलीवर भीम सैनिकांनी त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलीस ठाण्यात भीमसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केले आहेत.