
Sambhaji Bhide on Mahatma Gandhi । अमरावती : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे सतत वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावरून राजकीय वर्तुळात देखील आपल्याला संघर्ष झाल्याचे पाहायला मिळते. परंतु, त्यांची या वक्तव्याची दखल सरकार (Government) घेत नसल्याचा आरोप विरोधांकडून सतत केला जातो. नुकतेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (Latest Marathi News)
Viral Video । मुंबईकरांचे हाल संपता संपेना! कंबरेएवढे पाणी आणि वाहतूक कोंडी, पहा व्हायरल व्हिडिओ
‘महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी हे त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडिल आहेत,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यावर अखेर त्यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Pune News । धक्कादायक! बंदी असताना प्रवास करणे आले अंगलट, तिघांसह कार कोसळली धरणात
राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेत्या ॲड. आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ” संभाजी भिडे यांना फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार केलं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. भिडेंना कुणाचे अभय आहे? असा संतप्त सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
PM Kisan Yojna। 14 वा हप्ता जमा झाला नाही? काळजी करू नका, ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा फोन
हे ही पहा