मांडवगण मधील मुख्य वाहतुकीचा रस्ता असलेला एस टी स्टॅण्ड ,मराठी शाळा रोडला अवजड वाहतूक आणि पावसाने प्रचंड प्रमाणात खड्डे पडून हा रस्ता खचला होता.संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी रस्त्यांवर पडलेल्या खड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला होता.तसेच या रस्त्याचे काम न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्यात आणून बसविण्याचा इशारा ससंभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला होता तसेच रस्त्या लगतचे अतिक्रमण हटवून नवीन रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती.
Amit Shah । ब्रेकिंग! अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे निधन, भाजप नेत्याचे सर्व कार्यक्रम रद्द
सदर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.लकवरच गावच्या विकासात नवीन रस्त्याने भर पडणार आहे आणि नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षण,आरोग्य,रस्ते,पाणी या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाच्यासाठी वेळोवेळी आंदोलने करून आवाज उठविला जातो. संभाजी ब्रिगेडच्या सततच्या पाठपुराव्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सा.बा.विभागाचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संग्राम देशमुख(प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,शेतकरी आघाडी),विनोद देशमुख,माऊली कन्हेकर,सुभाष शिंदे,कण्हेरकर मेजर,योगेश देशमुख,बाप्पू घोडके,अकिब काझी