Site icon e लोकहित | Marathi News

Sambhaji Nagar Fire । हृदयदावक! छत्रपती संभाजीनगर येथे हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, झोपेत कामगार जिवंत जळाले

Sambhajinagar Fire

Sambhaji Nagar Fire । संभाजी नगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात अचानक भीषण आग लागली, यामध्ये ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात सर्व 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगारांचा जीव वाचू शकला. वाळज औद्योगिक क्षेत्रातील सनशाइन एंटरप्रायझेस या हँडग्लोव्ह बनवणाऱ्या कंपनीत ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. (Sambhaji Nagar Fire)

Viral Video । लंडनमध्ये जोरदार वाऱ्यामुळे विमानाचा तोल बिघडला, लँडिंग पाहून लोक हादरले

ही घटना शनिवारी 30 डिसेंबर रोजी रात्री उशिरा कंपनीत सुमारे 10 कामगार झोपले असताना घडली. सनशाईन एंटरप्रायझेस, एक हातमोजे बनवणारी कंपनी, सी 216, वाळुंज औद्योगिक क्षेत्रामध्ये 20 ते 25 कामगार काम करतात. कंपनीतच 10 कामगार राहत होते. काल रात्री सर्वजण झोपलेले असताना अचानक उष्मा वाढल्याने झोपलेले काही कर्मचारी जागे झाले. बाहेर पडताना आग लागल्याने बाहेर पडणे शक्य नव्हते, मात्र काही कामगारांनी पत्रे उचलून झाडाच्या साहाय्याने बाहेर आले.

Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का, पक्षाला पडले मोठे खिंडार; मनसे पक्षात कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश

ही घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारखान्याला आग लागली होती. यावेळी स्थानिक लोकांनी सांगितले की, कारखान्यात 6 लोक अडकले आहेत. यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आत जाऊन 6 मृतदेह बाहेर काढले. त्याचवेळी कंपनीत आग लागली तेव्हा 10-15 कर्मचारी आत झोपले होते, असे सांगण्यात आले. यातील 4 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले, मात्र 6 जणांचे प्राण वाचू शकले नाहीत.

Supriya Sule । ब्रेकिंग! सुप्रिया सुळे दहा महिने घरी जाणार नाहीत; घेतला सर्वात मोठा निर्णय

Spread the love
Exit mobile version