मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आता यावर माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली.
शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण मिळताच देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकशाहीचा भाग त्यामुळे ज्यांना जे चिन्ह मिळाल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.मागच्या दोन तीन वर्षातील अस्थिर सरकारमुळे लोकांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आमचे प्रश्न कधी सुटणार इतकंच लोकांना जाणून घ्यायचंय. असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
चोर म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे उत्तर; म्हणाले, “आता तरी…”
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “मी अनेक प्रश्न सरकारकडे घेऊन जात आहे मात्र अद्याप ते प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे माझी सरकारला एकच विनंती आहे सरकारने लवकरात लवकर प्रश्न सोडवावेत. पक्षाचं नाव आणि चिन्हा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याशी स्वराज्य संघटनेचा काहीही संबंध नाही. असं देखील यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
“…त्याचा काही परीणाम होत नसतो”, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया