Sameer Khan Accident । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झाला आहे. समीर खान असे त्यांचे नाव असून, या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी समीर खान यांच्या पत्नी निलोफरही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या, ज्यांना हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले आहे.
समीर खान आणि निलोफर हे दोघेही त्यांच्या घराजवळील रुग्णालयात नियमित चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर, ते रुग्णालयातून बाहेर येत असताना समीर खान यांनी त्यांच्या चालकाला गाडी आणायला सांगितले. चालक गाडी आणत असताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला, ज्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. या धडकेत समीर खान यांना मल्टिफॅक्चर झाले आहेत, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात ऑपरेशन करावे लागले.
अपघातानंतर, समीर खान यांना गंभीर अवस्थेत ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असून, त्यांना काही काळ अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात येणार आहे. निलोफर यांना हाताला दुखापत झाली असली तरी त्यांच्या प्रकृतीत स्थिरता आहे, अशी माहिती समोर येत आहे.
Delhi New CM Atishi । सर्वात मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांची निवड
समीर खान यांचा अपघातामुळे नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे, तसेच स्थानिक नेते व समर्थक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अपघाताची गंभीरता लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने संबंधित चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
Sujay Vikhe Patil । मोठी बातमी! सुजय विखे पाटील ‘या’ ठिकाणाहून निवडणूक लढविण्यास इच्छुक