Sampada Patil । जळगाव : लोकसभा निवडणुकीवरून (Loksabha election) राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेतेमंडळी तिकीट नाकारल्याने पक्षांतर करत आहेत. भाजपला (BJP) आगामी निवडणुकीपूर्वी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील बडा नेता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. (Latest marathi news)
Jitendra Awhad । “…..तर अजितदादा जेलमध्ये जाणार,” जितेंद्र आव्हाडांचा इशारा
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्या पत्नी संपदा पाटील यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळू शकते. दरम्यान, उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण त्याजागी भाजपने स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली.
Vasant More । वसंत मोरे घेणार मोठा निर्णय, पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट
त्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज होते. मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला देखील उन्मेष पाटील हे हजर नव्हते. तसेच भाजपने उमेदवारी दिली नसल्याने उमेश पाटील यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली होती. अशातच आता संपदा पाटील या ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.