Samruddhi Highway Accident । समृद्धी महामार्ग अपघाताचे केंद्र बनले (Accident On Samriddhi Highway) आहे. सतत या ठिकाणी अपघात घडत असतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, शनिवारी (१० फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास कार दौलताबाद परिसरात आली. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून जात असलेल्या अज्ञात वाहनांना धडकली आणि भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातावेळी कारच्या एअरबँग उघडल्या. पण कुणाचाही जीव वाचला नाही.
Pune Crime News । गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं, पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या