
Samruddhi Mahamarg । महाराष्ट्राची ‘समृद्धी’आणि विकासासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र समृद्धी महामार्ग झाल्यापासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग कायम चर्चेत असतो. या महामार्गावर दररोज अपघात झाल्याच्या घटना घडत असतात. वाहनांचे टायर फुटून, वन्य प्राणी आडवे जाऊन, चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटून या महामार्गावर अपघात होत असतात.
Samsung Galaxy A54 5G । वाचतील हजारो रुपये! सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळेल 25,500 रुपयांपर्यंत सवलत
हा महामार्ग सुरू झाल्यापासून अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे. माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आठ महिन्यांमध्ये 700 हून जास्त अपघात झाले आहेत. त्याचबरोबर शंभर पेक्षा जास्त अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. असा हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Sharad Pawar । राज्यावर दुष्काळाचे सावट! शरद पवारांनी दिल्या सरकारला महत्त्वाच्या सूचना
समृद्धी महामार्ग वरील अपघाताची कारणे
समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळेला चालकाला येणारी झोप हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर सर्वात जास्त बळी चालकाला येणाऱ्या झोपेमुळे झाल्याचे अहवालामध्ये समोर आले आहे. याबाबत महामार्ग सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. त्याचबरोबर ओव्हर स्पीडिंग म्हणजेच तीव्र गतीने वाहन चालवल्यामुळे 21 अपघात घडले असून यामध्ये 33 जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर वाहनाचे टायर फुटल्यामुळे देखील अपघात झाले असून यात दहा जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात जास्त अपघात कोणत्या वेळेत?
सर्वात जास्त अपघात समृद्धी महामार्गावर कोणत्या वेळेत झाले याचा देखील अभ्यास पोलिसांच्या महामार्ग सुरक्षा दलाने केलेला आहे. यानुसार मध्यरात्री बारा वाजेपासून पहाटे तीन वाजेच्या दरम्यान जास्त अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजता देखील या महामार्गावर अपघात झाले आहेत.
Government Scheme । शेतकरी बनणार उद्योजक! सरकार देत आहे 50 लाख रुपये, असा घ्या लाभ