
Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावरील अपघात काही केल्या कमी होत नाहीत. या महामार्गावर सतत अपघात घडल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या महामार्गावर अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रशासनाने ठोस पाऊल उचलून देखील अपघात थांबत नाहीत. दरम्यान, या महामार्गावर पुन्हा एक अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ ही घटना घडली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
हेल्थ मिनिस्टर स्त्री आरोग्याचे महत्त्व सांगणारा एक आगळावेगळा कार्यक्रम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये १४ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Gopichand Padalkar । धनगर आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर यांनी केली सर्वात मोठी घोषणा!