Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून समृद्धी महामार्ग सतत चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र या महामार्गावर दररोज अपघात घडत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. काही केल्या या ठिकाणचे अपघात सत्र कमी होत नाही. समृद्धी महामार्गावरील अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना करून देखील या ठिकाणचे अपघाती थांबत नाहीत. सध्या देखील या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Washim Accident News)
समृद्धी महामार्गावर हे अपघात चालकाचे नियंत्रण सुटून, त्याचबरोबर वन्यप्राणी आडवे येऊन, गाडीचे टायर फुटून घडत आहेत. सध्या देखील वन्यप्राणी वन्य प्राणी आडवा येऊन कारचा भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला जाणाऱ्या कारचा वन्य प्राण्याला धडकून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही मात्र सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. सर्व जखमी हे चंद्रपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन ते चंद्रपूरला चालले होते.
वन्यप्राणी समृद्धी महामार्गावर सर्रास वावरतात. यामुळे या वन्य प्राण्यांमुळे मोठे अपघात देखील होत आहेत. चंद्रपूरचे हे कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन घराकडे चालले होते. यावेळी प्रवास करत असताना अचानक नीलगाय आडवी लावलेली कठडे ओलांडून आले अचानक समोर आलेल्या वनगायीमुळे हा अपघात झाला आहे.