Site icon e लोकहित | Marathi News

Samrudhhi Highway Accident । धक्कादायक बातमी! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला RTO अधिकारी जबाबदार; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Samrushi Highway Accident

Samrudhhi Highway Accident । समृद्धी महामार्ग अपघाताचे केंद्र बनले (Accident On Samriddhi Highway) आहे. सतत या ठिकाणी अपघात घडत असतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. संभाजीनगरच्या वैजापूर येथे शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर ( Samriddhi Highway) एक भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात जागीच 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Farmers Suicide । धक्कादायक! महाराष्ट्रात आठ महिन्यांत 1809 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; वाचा कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात जास्त आकडेवारी?

याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगरच्या वैजापूर जवळील आगर सायगाव या ठिकाणी एक ट्रक थांबलेला होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव खाजगी बसने या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बस दूरवर जाऊन पलटी झाली आणि या अपघातात बसमधील जवळपास 12 प्रवासी जागीच ठार झाले तर 20 ते 22 प्रवासी जखमी झाले. यानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्याचबरोबर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तसेच जखमींना माहितीची घोषणा देखील करण्यात आली. दरम्यान आता अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Samriddhi Highway Accident। आरटीओ अधिकारी मध्यरात्री काय करत होते? समृद्धी महामार्गावर अपघात नेमका कसा झाला? लहान मुलाने सांगितली धक्कादायक माहिती

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातासाठी आरटीओ अधिकारी जबाबदार असल्याचं सांगत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणहून पळ काढला आणि नंतर परत येऊन त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Afghanistan Earthquake । सर्वात मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंप, 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

Spread the love
Exit mobile version