Samsung Discount Offer : तुम्हाला एखादा प्रीमियर स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही ऑफर खास तुमच्यासाठीच आहे. सॅमसंगचा दमदार फीचर्स असणारा स्मार्टफोन आता फक्त २२ हजार रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. Samsung Galaxy S22 Plus हे त्या फोनचं नाव आहे. सॅमसंग कंपनी मोठ्या डिस्काउंटखाली Samsung Galaxy S22 Plus हा फोन विकणार आहे. त्यामुळे आता १ लाख रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त २२ हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. सॅमसंगचा हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर दिला आहे.
पुण्यातील ट्राफिक कर्मचारी निलंबित; लाच घेताना कॅमेरात कैद
ही ऑफर फ्लिपकार्ट (Flipkart) द्वारे सेलच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. ही खास ऑफर मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच सुरू असणार आहे. जर तुम्हाला Galaxy S22 Plus स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचाय? तर ही खास ऑफर फक्त आजच आहे त्यामुळे तुम्हाला आजच फोन बुक करावा लागेल. या स्मार्टफोनचे फीचर्स कसे आहेत ८ जीबी रॅम बरोबर १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट आहे.
Devedra Fadanvis | शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावरून देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी, म्हणाले…
Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोनची ओरिजनल किंमत १,०१,९९९ रुपये एवढी आहे. जो Flipkart वर ४६ % डिस्काउंट सह ५४,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर चक्क ३० हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत फक्त २४,९९९ रुपये एवढी होणार आहे. शिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १० % सह फोन खरेदी करता येणार आहे.