Sangli News । प्रेमप्रकरणामुळे हत्याकांड! मुलीच्या कुटुंबीयांकडून मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Crime

Sangli News । दिवसेंदिवस प्रेम प्रकरणामध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॉलेजचे तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात मात्र याची शिक्षा कधी कधी त्यांच्या कुटुंबियांना देखील भोगावी लागते. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Sushil Kumar Shinde । ब्रेकिंग! काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसणार? दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

मुलीच्या नातेवाईकांनी विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मुलाच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही मारहाण एवढी जबर होती की यामध्ये मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

Crime News । मोठी बातमी! जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, मुलीला पळवून नेण्यासाठी आले होते

दादासाहेब रामचंद्र चौगुले असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चौगुले यांच्या मुलाचे एका मुलीवर प्रेम होते त्यानंतर त्या मुलाने मुलीला पळवून नेले. यानंतर मुलीला पळवून नेल्याचा राग तिच्या कुटुंबीयांना अनावर झाला. मुलीचे कुटुंब चांगलेच संतापले आणि त्यांनी मुलाच्या वडिलांना म्हणजे दादासाहेब रामचंद्र चौगुले यानायांना खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.

Crime | हृदयद्रावक घटना! पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ६ तुकडे नाल्यात फेकले; समोर आलं धक्कादायक कारण

आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते दोघे कुठे आहेत ते सांगा असे म्हणत जोरदार मारहाण करण्यात आली यानंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चार जणांना अटक केली आहे.

Sharad Pawar | राम मंदिराबाबत शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!

Spread the love