घरा घरात पाहिली जाणारी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध, अरुंधती व संजना या कलाकाराचे लाखो चाहाते वर्ग आहे. संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सतत सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आता रुग्णालयात दाखल झाली आहे.
भारतामध्ये संविधान दिवस कधीपासून आणि का साजरा करतात?, वाचा सविस्तर माहिती
रुपालीने सोशल मीडियावर रुग्णालयामधील कपड्यांमध्ये फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटदवर शेअर करत माहिती दिली. रुपालीची छोटीशी सर्जरी करण्यात आल्यामुळे तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Sharad Pawar: शिंदे सरकार कधी कोसळणार?, प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…
रुपाली फोटो शेअर करत म्हणाली, “आयुष्यामध्ये अप्रत्यक्षरित्या काही गोष्टी घडत असतात आणि अशा प्रसंगांना आपण हसत सामोरं जाणं हाच उत्तम पर्याय असतो. काल माझी छोटीशी सर्जरी झाली आहे. परंतू आता माझी तब्येत बरी आहे. तुम्ही दिलेलं प्रेम व आशिर्वादासाठी मी आभारी आहे. बऱ्याचवेळा आपण आपल्या शरीरामध्ये जे बदल घडत असतात त्याकडे दुर्लक्ष करतो. शारीरिक त्रासाला आपण दुर्लक्षीत न करता म्हत्तव द्यायला हवे.”
धक्कादायक! दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला; वाचा सविस्तर