
Eknath Shinde । केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या (Loksabha election 2024) तारखा जाहीर करताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नाराज नेते पक्षांतर करत आहेत. अशातच निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे (Sanjay Kokate) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये (Nationalist Congress Sharad Chandra Pawar group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. माढा मतदारसंघातून बबनराव शिंदेंविरोधात (Babanrao Shinde) मी विधानसभा लढणार असून येथील माढातील जुलमी आणि भ्रष्टाचारी राजवट घालवण्यासाठी मी लढणार असून माढा लोकसभेला तुतारी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचा देखील जोरदार प्रचार करणार आहे,” असंही संजय कोकाटे म्हणाले आहेत.
Prithviraj Chavan । शरद पवारांनी आदेश दिले तर… पृथ्वीराज चव्हाण यांनी केली मोठी घोषणा
संजय कोकाटे यांच्या सूचक वक्तव्यामुळे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. जर संजय कोकाटे यांनी शिंदे गटाला रामराम ठोकला तर निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो.