Sanjay Nirupam Resign । लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी संकटात सापडलेल्या काँग्रेसला (Congres) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी लोकसभा खासदार मिलिंद देवरा आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली. अशातच आता काँग्रेसच्या बड्या नेत्यानेदेखील काँग्रेसला रामराम ठोकला आहे. (Latest marathi news)
पक्षातून काल हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आपला सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते संजय निरुपम हे पक्षावर नाराज होते. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्यांनतर हा वाद आणखी वाढला होता. तसेच त्यांची संजय निरुपम यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले होते.
Lok Sabha Election । महायुतीत सुटला ‘त्या’ जागांचा तिढा! मध्यरात्रीच घेतला मोठा निर्णय
अशातच काल अशातच काल काँग्रेस नेते के.सी वेणुगोपाल राव यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत आहे, असे पत्रातून सांगितले होते. त्यानंतर आता संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. संजय निरुपम कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Pune News । मोठी बातमी! भाजपच्या माजी नगरसेविकाचा होरपळून मृत्यू