
मागच्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची लूट झाली असून निःपक्ष चौकशीची मागणी देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. (Allegation of financial misappropriation of Rs 500 crore in Bhima Cooperative Sugar Factory in Daund)
Yogi Adityanath : ब्रेकिंग! योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी
यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून खासदार संजय राऊत यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्यांनी सीबीआयकडे तक्रार करण्याचे म्हटले होते. आता याच पार्शवभूमीवर संजय राऊत २६ एप्रिलला म्हणजेच उद्या भीमा पाटस कारखान्यासमोर सभा घेणार आहेत.
भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे या सभेत राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाविरोधात कायदेशीर नोटीस जारी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?