Sanjay Raut । संजय राऊत यांना मोठा धक्का! धाकट्या भावाला नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut

Sanjay Raut । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना नोटीस पाठवली आहे. माहितीनुसार खिचडी घोटाळा प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Supriya Sule । अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर पहिला हार मी घालेन; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

त्यामुळे आता संदीप राऊत यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटात देखील एकच खळबळ उडाली आहे. राजकीय ओळख आणि ताकतीचा वापर करून कंत्राट देण्यात आल्याचा आरोप याप्रकरणी संदीप राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

दरम्यान, राज्यामध्ये सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते दोन महिने जेलमध्ये होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर होऊन त्यांची सुटका झाली. यानंतर संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडी करून अटक करण्यात आली. या दरम्यानच्याच काळात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरेश चव्हाण यांची देखील चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता संदीप राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल

Spread the love