मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक बडे नेते स्वतःच पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा वारंवार होताना दिसत आहेत. यामध्येच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज एक मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये लवकरच भूकंप होईल असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane has claimed that there will be an earthquake in the politics of the state soon.)
Google Update । तुम्हीही सर्च करण्यासाठी गुगलचा वापर करता का? समोर आली मोठी अपडेट; एकदा वाचाच
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिवसेना सोडणार (Thackeray group MP Sanjay Raut will quit Shiv Sena) असल्याचा दावा राणेंनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. नितेश राणे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. मला ही माहिती सूत्रांनी दिली. असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत खरच शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.