
आज १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा दहावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांनी तसेच शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्येच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो (Photo) शेअर केला आहे. संजय राऊतांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
संजय राजतनी ट्विटरवर (Twitter) एक जुना फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है..साहेब..विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र!”
मोठी बातमी! उसाच्या गाळपात बारामती अॅग्रो सर्वात पुढे; वाचा सविस्तर
हे नाते खुप जुने आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi
त्याचबरोबर याच ट्विटमध्ये राऊतांनी एक पोस्टर देखीलत्या शेअर केलं आहे. त्यामध्ये प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी, असा उल्लेख केलाय. सध्या संजय राऊतांच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.