
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम ‘या’ ना ‘त्या’ कारणाने चर्चेत असतात. दरम्यान शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी गंभीर टीका केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘संजय राऊत यांनी आजपर्यंत हातात टेंभा घेऊन महाराष्ट्र पेटवायचं काम केले आहे. आजपासून मी त्यांचे आगलावे म्हणून बारसे करतोय, शिवसेना संपवल्याबद्दल शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याकडून त्यांना मोठं बक्षीस मिळणार आहे.’ अशी टीका शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.
कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर; पाहा VIDEO
‘मी भोसले आहे, माझं नाव बदलायच्या भानगडीत पडू नको’ असा सणसणीत टोला व सल्ला देखील यावेळी शहाजीबापू यांनी यावेळी लागवला आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी शहाजीबापू यांचेच नाव बदलायची वेळ आल्याचं सांगितलं. दरम्यान शहाजीबापूं पाटलांनी देखील यावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “माझ्या पणजीचे नाव जिजाबाई, आजोबांचे नाव संभाजी, बापाचे नाव राजाराम, भावांची नावे शिवाजी, तानाजी, नेताजी आणि मालोजी. माझे आडनाव भोसले आहे, आमचे नाव बदलायच्या भानगडीत राउतांनी पडू नये. आमच्या रक्तात शिवछत्रपतींचा इतिहास भरला आहे.
संजय राऊत यांनी खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मातोश्री आणि उद्धव साहेबांचे राजकारण संपविण्याचा विडा उचलला आहे. फक्त उद्धव ठाकरे यांची स्तुती करायची, परंतु त्यांचे सगळे कसे नेस्तनाबूत होईल तेवढेच पाहायचे. हेच राऊंतांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांची सेना संपवायची हा त्यांचा गुप्त डाव असून शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी ( Soniya Gandhi) यांनी ती जबाबदारी संजय राऊत यांच्यावर सोपविली होती. आता याचे मोठे बक्षीस शरद पवार आणि सोनिया गांधी संजय राऊतांना देतील. असे म्हणत शहाजीबापू यांनी संजय राऊतांवर गंभीर टीका केली आहे.
अरमान मलिकच्या पत्नींमध्ये पुन्हा एकदा वाद! व्हिडीओ होतोय व्हायरल