केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या अनपेक्षित निर्णयावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून शिवसेना ( Shivsena) संपवावी यासाठी सगळा डाव रचला जात आहे. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना राऊत म्हणाले की, निवडणूक ‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असे करावे लागणार आहे. खोक्यांचा वापर कुठंपर्यंत झालाय हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना प्रमुख व शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसेना पक्ष उभा झाला होता. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे.
WhatsApp ने केले ‘हे’ ३ नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; चॅटिंगची मजा होणार दुप्पट
यावेळी संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला देखील धारेवर धरले आहे. निवडणूक आयोगाने ( Election commission) आता लोकांचा विश्वासही गमावला आहे. स्वार्थापोटी स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे, हे दिसून येत आहे. निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाचेतरी गुलाम असल्यासारखं वागत आहे. असे म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!