मुंबई : सध्या राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊतांनी नाशिक येथील खासदार हेमंत गोडसेंना टोला लगावलत आव्हान दिलं होतं. त्यालाच आता हेमंत गोडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा
यावेळी हेमंत गोडसे म्हणाले, संजय राऊत यांनीच शिवसेनेच वाट्टोळ केलं आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. राऊतांनी संपूर्ण शिवसेनेचं वाटोळं केलं. यांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचं काम देखील संजय राऊत करत आहेत. असा गंभीर आरोप देखील हेमंत गोडसे यांनी केला आहे.
बिग ब्रेकिंग! राज्यात प्लास्टिकवरील कडक बंदी हटवली
दरम्यान, या एका माणसामुळे शिवसेनेची वाट लागली, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात संजय राऊत करतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचेही हेमंत गोडसे यावेळी म्हणाले.
“शिवरायांचा अपमान करण्याऱ्या राज्यपाल कोश्यारींना टकमक टोकावरून फेकून द्यावं”