Sanjay Raut । खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत सूत्रधार! बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Sanjay Raut

Sanjay Raut । मुंबई : ठाकरे गटाला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नुकतेच कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी (Khichdi Scam) चौकशीसाठी ईडीने ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना हजर राहण्याचे समन्स पाठवलं आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा खळबळजनक दावा बड्या नेत्याने केला आहे. (Latest marathi news)

Pushpa 2 Teaser । पायात घुंगरू, डोळ्यात आग अन् उधळला गुलाल; ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर झाला रिलीज

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी खिचडी घोटाळा प्रकरणी ८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. अशातच आता काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनीही संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत संजय निरुपम बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाला की, ” संजय राऊत खिचडी घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार असून त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली मिळाली आहे,” असा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. (Sanjay Nirupam on Sanjay Raut)

Amol Kirtikar । ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! बडा नेता ईडीच्या फेऱ्यात

” संजय राऊत यांनी आपल्या भावाच्या, मुलीच्या नावाने चेकद्वारे रक्कम घेतली. संजय राऊत यांची मुलगी निकिताच्या खात्यात 3लाख 50 हजार, 5 लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली आहे. संदीप राऊत यांच्या खात्यात 5 लाख, 1 लाख 25 हजार रुपये जमा झाले आहेत. त्याशिवाय सुजीत पाटकर यांच्या खात्यात 14 लाख, 14 लाख, 10 लाख, 1 लाख 90 हजार, 1 लाख 90 हजार जमा झाले आहेत,” असे संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.

IPL 2024 । लखनऊला सर्वात मोठा झटका! स्टार खेळाडूला मोठी दुखापत, एकाच ओव्हरनंतर…

Spread the love