खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. गुरुवारी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी राऊतांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे यावर अनेक चर्चा होत आहेत.
झुंड चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
भेटीमध्ये ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा –
संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीमागील नेमकं काय कारण? कोणती चर्चा झाली असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. त्याचबरोबर ठाकरेंनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा वाद अजून पेटण्याची शक्यता आहे.
‘या’ गावात माकडाची दहशद, ५० गावकऱ्यांना केले जखमी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर राज्यपालांवर जोरदार टीका करत हे पार्सल वृद्धाश्रमात पाठवा असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणले.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी पाळावी लागणार ‘ही’ अट