‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्याच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या. संजय राऊतांच्या या वक्तव्याचा मुद्दा विधानसभा अधिवेशनातही सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरला. त्याचबरोबर संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंमधील वेतनाचा फरक वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
दरम्यान याबाबत आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल आहे. संजय राऊत म्हणाले, “मी काय म्हणालो हे समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रकारे शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांचा विधिमंडळाबाहेर उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. त्यांना उद्देशून मी ते वक्तव्य केलं होते. असं संजय राऊत म्हणाले.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “खरं तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे. ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत” असं स्पष्टीकरण राऊतांनी दिल आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.