मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. कसब्यात दुहेरी लढत होत असून भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Raas) यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत असून. अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरूणी थेट लंडनहून पुण्यात!
दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर खूप कमी प्रमाणात पुणेकर मतदानाला बाहेर पडल्याचे दिसले. त्यावरुन ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले “आज रविवार असल्यामुळे पुण्याच्या पद्धतीने मतदान होईल. त्यामुळे थोड्या वेळाने पुणेकर मतदानाला उतरतील आणि पुणेकर एकदा मतदानाला उतरल्यावर लांब रांगा लागल्याशिवाय दिसणार नाहीत.” अशा शब्दात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! मतदानावेळी भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
प्रचाराच्यावेळी पुणेकरांनी खूप मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला होता. यावरून पुणेकर घरी बसतील, असे वाटत नाही. संध्याकाळपर्यंत चांगले मतदान होईल, अशी अपेक्षा राऊतांनी यावेळी यांनी व्यक्त केली.
सुप्रिया सुळे यांनी केला मोठा दावा; म्हणाल्या, “पुणे मेट्रोच्या कामात तांत्रिक चुका”