
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्या जामीनअर्जावर झालेल्या सुनावणी नुसार त्यांना आज जामीन मिळाला आहे. यामुळे संजय राऊत यांचा गेले 100 दिवसांचा कोठडीतील मुक्काम हलणार आहे. परंतु, ईडीने मात्र या जामीन अर्जावर स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
स्वतःशीच लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केली प्रेग्नेंन्सीची पोस्ट; सोशल मीडियावर होतीये चर्चा
गेल्या 1 ऑगस्ट पासून संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी कारवाई सुरू होती. यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावली गेली होती. संजय राऊत यांच्याकडून विशेष पीएमपीएल न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. यावर आज न्यायालयाने सुनावणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूधसंघ डबघाईला; कामगारांना पगार देण्याइतकी सुद्धा ऐपत राहिली नाही
याआधी देखील संजय राऊत यांनी जामीनासाठी ( Sanajay raut Bail) अर्ज केला होता. परंतु त्यावेळी ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेत विरोध दर्शविला होता. आतादेखील ईडी संजय राऊत यांच्या जामीनाबाबत हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोठी बातमी! शेतातील पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ; वाचा सविस्तर
दरम्यान संजय राऊत यांना जामीन मंजूर होत असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आनंद व्यक्त केला जात आहे. यावेळी आनंद व्यक्त करताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) भावनिक झाल्या असून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आहेत. तसेच संजय राऊत यांच्या स्वागताची शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.