मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडी ने शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. इडी कोर्टाच्या सुनावणी दरम्यान इडी ने आठ दिवसाची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी आठ दिवसापेक्षा कमी कोठडी द्या अशी मागणी केली. व मग कोर्टाने त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली. चार ऑगस्टपर्यंत अशी कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. वैद्यकीय कारणामुळे रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची चौकशी होणार नाही अशी ईडीने कोर्टात हमी दिली.
संजय राऊत यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाखांचा फायदा झाला असे विशेष सहकारी वकील हितेन यांनी सांगितलं. इडीने संजय राऊत यांचे फ्रंट मॅन प्रवीण राऊत आमच्याकडे आहे. किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड झाली आहे असा आरोप इडी ने केला आहे.
संजय राऊत यांच्या वकिलांनी आठ दिवसाच्या कोठडीस विरोध केला. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आली असा आरोप त्यांनी केला. आर्थिक गुन्हा शाखेने 2020 मध्ये पत्राचाळ प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. आणि आता संजय राऊत 12:30 लाआटक करण्यात आली.
नेमकं काय आहे पत्राचाळ गैरव्यवहार?
मुंबईमधील गोरेगाव येथे पत्राचाळी मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची जमीन आहे. या चाळीचा पुनर्निर्मान करण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन यांना दिला होता परंतु त्यांनी त्या जागेतील काही भाग इतर खाजगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.