मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना पत्राचाळ प्रकरणी अटक होऊन ते ईडीच्या कोठडीमध्ये होते. नंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील ईडीने चौकशी केली होती.
संजय राऊतांना ईडी कोठडीमध्ये ठेवलं जाणार का न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. पण न्यायालयाने संजय राऊत यांना थोडासा दिलासा दिलाय. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊतांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. संजय राऊत अजपासून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहेत.
दरम्यान, वर्षा राऊतांची (Varsha Raut) देखील ईडीने चौकशी केली. यावेळी ईडीने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही. आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन.”