Sanjay Raut । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यामधील सर्कीट हाऊस या ठिकाणी बैठका सुरु आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची पुण्यात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sadabhau Khot । सदाभाऊ खोत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली सर्वात मोठी मागणी!
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील त्याच भागातून खासदार आहेत. रोहित पवार यांचा ही जवळ मतदारसंघ आहे. त्यामुळे या तिघांमध्ये कामासंदर्भात शासकीय बैठक झाली असेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका
त्याचबरोबर यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “महाविकास आघाडीची जागा वाटप आम्ही अंतिम टप्प्यात आणली आहे. आम्ही लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये काम करत आहे. त्यामुळे आम्ही सर्वांसोबत चर्चा करुनच जागा वाटपाचा तिढा सोडवणार आहोत, असं देखील संजय राऊत म्हणाले.
Yugendra Pawar । कोण आहेत युगेंद्र पवार? लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना दिला धक्का