Sanjay Raut । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर (Central Govt) हल्ला करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना खोटारडे म्हटले. राऊत म्हणाले, “चार राज्यांमध्ये निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत, आणि मोदी मात्र ‘वन नेशन-वन इलेक्शन’ बद्दल बोलतात. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पराभव होण्याची भीती असल्याने सरकारला जास्त वेळ पाहिजे.” (Politics News)
संजय राऊतांनी ‘लाडकी बहिण योजना’ बद्दल देखील जोरदार टीका केली. “ही काही नवीन क्रांती नाही. याआधी सुद्धा महिलांसाठी अशा योजना आणल्या आहेत. मात्र, हे सरकार लोकांच्या कराच्या पैशातून योजना राबवत आहे. आमचं सरकार आलं, तर आम्ही महिलांना 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द आहे,” असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, “माकडाच्या हाती मशाल दिली तर तो काय करणार?” यावर राऊतांनी प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदेंना “रावणाची औलाद” असे संबोधले.
राऊतांनी श्रीकांत शिंदेंच्या डॉक्टरीच्या सर्टिफिकेटची सत्यता तपासण्याची मागणी केली. त्यांनी श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप करताना म्हटले, “श्रीकांत शिंदे हा माकडाचा मुलगा आहे. त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला आहे. शिवाय, श्रीकांतला उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवलं, नाहीतर त्याला याची लायकी नव्हती. त्याचा बाप माझ्याकडे काम मागायला आला होता. बेरोजगार आहे, डॉक्टर असूनही रुग्णालय चालवू शकत नाही. बापाने नाक रगडलं, लाज वाटली पाहिजे, बेशर्म माणूस!” अशा खालच्या शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला.