
Sanjay Raut । इंदापूर मध्ये आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली होती. त्यानंतर आता सोलापूर मध्ये ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कारवर चप्पलफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार संजय राऊत हे गाडीत बसून जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे.
Bageshwar Baba Threat Case । बागेश्वरबाबा धमकीप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अज्ञातांनी त्यांच्या कारवरवर चप्पलांनी भरलेली पिशवी फेकल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांसोबत हुरडा पार्टी केली. त्यानंतर त्यांनी एका सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यानंतर सोलापुरातून जात असताना त्यांच्या कारवर चप्पलफेक करण्यात आली आहे.
सोलापूर मधील बाळे या ठिकाणी एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर संजय राऊत परतत असताना चप्पल फेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चप्पल फेक झाल्यानंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्ते पसार झाले आहेत.
पहिल्यांदाच, iPhone 14 Plus इतका स्वस्त, 35 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा!