महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण शिंदे गटाकडे दिले आहे. यामुळे शिंदे व ठाकरे गटातील वाद चांगलेच पेटले आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणात कायम सारखी परिस्थिती राहत नाही. यामध्ये माणूस कधी खाली जातो तर कधी वर येतो. पण लोक निराश होऊन मनात येईल ते बोलतात. यामुळे त्यांच्या बुद्धीची दया येते. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. लोकांना वाटते असे बोलल्याने आपण त्यांना मोठे नेते म्हणतो. संजय राऊत ( Sanjay Raut) जे बोलतात ते निर्बुद्धपणे बोलतात. त्यांना मी काय उत्तर देऊ ? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
“संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार”, निलेश राणेंचे ट्विट चर्चेत
तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे लिमिटेड डिक्शनरी आहे. त्यात फक्त 10-20 शब्द आहेत. उद्धव ठाकरे तेच शब्द फिरवून फिरवून वापरतात. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना देखील फटकारले आहे. संजय राऊत यांच्यावर हल्ला करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी केल्याने सध्या ठाकरे आणि शिंदे गटात वादाचा भडका उडाला आहे.
ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट; ऊस तुटला जाईल की नाही? या भीतीचा घेतला जातोय फायदा