Sanjay Raut । संजय राऊतांचा अजित पवारांना गंभीर इशारा, म्हणाले; “धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात… “

Sanjay Raut

Sanjay Raut । सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) तयारी सुरु केली आहे. काही उमेदवारांची घोषणा झाली आहे तर अजूनही काही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात सभा घेताना पाहायला मिळत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut vs Ajit Pawar)

Vijay Shivtare | ब्रेकिंग! विजय शिवतारेंनी केली सर्वात मोठी घोषणा

“तुम्ही बारामती मतदारसंघात धमक्या देत आहात. तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. हा रस्ता आमचा असून जर तुमच्यात हिंमत असेल तर धमक्या न देता प्रचार करून निवडून येऊन दाखवा. ही केवळ बारामतीची नाही तर महाराष्ट्राची लढाई आहे. ही लढाई केवळ शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) लढाई नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

ते इंदापूरमधील महाविकास आघाडीच्या सभेमध्ये बोलत होते. बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.” “पायाखालची वाळू सरकली की दहशतवादाचा मार्ग निवडला जातो. माणूस घाबरला की त्याला पराभवाची भीती वाटू लागते. लोक स्विकारणार नाहीत याचं भय वाटलं की मोदींचा मार्ग सुरु होतो. जर कोणी बारामतीचं गुजरात करु पाहत असेल तर याठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील,” असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Prasad Pujari । ब्रेकिंग! 20 वर्षांपासून फरार असलेल्या गुंड प्रसादच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Spread the love