शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजही भाजपशी संबंध आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. यांनतर वादाला चांगलीच सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा आरोप चांगलाच झोंबला असून यावर ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
एक दोन नव्हे तब्बल आठ जणांनी केला स्कुटीवर एकत्र प्रवास; पाहा व्हायरल VIDEO
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केलेलं आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना देखील आवडले नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, असा इशारा दिलाय.
सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; स्वतःच केला खुलासा
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी, खासदार सुप्रिया सुळे, आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांचा बचाव करताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर अजूनही प्रकाश आंबेडकर यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही.