Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका करत असतात. सध्या देखील संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या खिशाला जो पेन आहे तो 25 लाखाचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या हातातील घड्याळाची किंमत काढा? मोदी सर्व गोष्टी महागड्या वापरतात. मोदींचे सर्व मित्र देखील अब्जाधीश आहेत. एकही गरीब किंवा चहा विकणारा नाही हे ढोंग भाजपने बंद केले पाहिजे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर घणाघात केला आहे.
Bjp । महाराष्ट्रातील लोकसभेच्या या जागांवर भाजप कधीही घोषणा करू शकते, उमेदवारांची नावे निश्चित
तुम्ही आमदार आणि खासदारांना 50-50 कोटी देऊन सरकार बनवत आहेत. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनगटाचे फोटो काढा. मग कळेल किती महागडे घड्याळ वापरत आहेत? घड्याळ वापरणे गुन्हा नाही मात्र कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची म्हणूनच त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतले. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Accident News । अंगावर काटा आणणारा अपघात; नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली; ६ जणांचा भयानक अंत
त्याचबरोबर, “संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीतले राजकारण केलं आहे. खोक्यातील राजकारण केलं नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.