
केरला स्टोरी (Kerala Story) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे समाजातील विविध घटकांकडून या चित्रपटावर टीका करण्यात येत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. एवढंच नाही तर केरला स्टोरी या चित्रपटामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. अशातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. (sanjay raut is going to make film named as ‘Diary of Maharashtra khoka’)
शेतातील काम करताना ट्रॅक्टरखाली सापडून बारामतीतील युवा शेतकऱ्याचा मृत्यू
” देशामध्ये केरला स्टोरी सारखे चित्रपट येत असतील तर आम्ही ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा चित्रपट काढणार आहे. यासाठी चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींना स्टोरी देणार आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असेल आणि त्यात माणसे कमी आणि खोके जास्त असतील ” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
मजुराच्या खात्यात १७ रुपयांऐवजी आले १०० कोटी, मग झालं असं काही वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
मुंबईत येथील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ” शिंदे गट हा कोणताही पक्ष नसून तो भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. त्या कोंबड्या कधीही कापल्या जातील. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. निवडणूक आयोगाने एखादा निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही ” असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
जेठालाल होण्याआधी दिलीप जोशी करत होते ‘हे’ काम, वाचून व्हाल थक्क