संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “मंत्रालयाकडंच झाडं लावलं तर भ्रष्टाचाराची प्रकरण…”

Sanjay Raut's attack on BJP; He said, "If trees are planted by the ministry itself, it will be a case of corruption..."

आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of the State Legislature) सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. तसेच काल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया याना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे राजकारण तापलं असून भाजपावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. यामध्येच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे.

“अशा व्हीपला आम्ही भीकही घालत नाही”, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची शिंदे गटावर जोरदार टीका

विरोधकांना नेहमीच पडद्यामागे काय कारस्थानं चालू आहेत, याचा सुगावा लागत असतो. दिवसेंदिवस देशातील वातावरण आणीबाणीपेक्षा भयंकर होताना दिसत आहे. विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवायचे, सरकारला प्रश्न विचारणाऱ्याना सुद्धा अटक करून गुंतवायचे, त्यांना जामीन मिळू द्यायचा नाही तसेच यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा. हे सर्रास चालू आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड ही राज्ये आघाडीवर आहेत. निवडणूका जवळ येतील तसे हे अधिक वाढत जाणार. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मोठी बातमी! ठाकरे गटाचे आमदार अडचणीत; सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील शिंदे गटाने व्हीप बजावला

मनीष सिसोदिया ( Manish Sisodiya) दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जगाला हेवा वाटण्यासारखे काम केले आहे. खरंतर असे निर्णय हे मंत्रीमंडळाचे असतात, व्यक्तीचे नसतात. आत्तापर्यंत मंत्र्यांना अटक झाल्याचे निर्णय मंत्रीमंडळाचे होते. या देशाचं दुर्दैवं आहे की आपली लोकशाही दररोज खड्ड्यात जाताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांच्या भेटीत देखील यावर चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

ह्रता दुर्गुळे ठरली ‘महाराष्ट्राची फेव्हरेट’; ट्रॉफी पाहून म्हणाली…

“आतापर्यंत अनेक नेत्यांच्या कन्यांवर कारवाया झाल्या. पण, तुमच्या पक्षात सगळे संत आणि महात्मेच भरलेत का? महाराष्ट्रात जर मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची शंभर प्रकरणं टपाटपा खाली पडतील. असं म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

स्त्यावर पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल; सीसीटीव्हीची करडी नजर कायम

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *